शुक्रवार, २४ एप्रिल, २०१५
गुरुवार, २३ एप्रिल, २०१५
ठराव मार्च 23 २०१५
दिनांक 23/४/२०१५ रोजी झालेल्या बैठकीत पुढील प्रमाणे निर्णय
घेण्यात आले .
१ ) कर्जाची मागणी करताना कर्ज मागणीपत्रा बरोबर एक कोरा चेक जोडावा
लागेल त्याशिवाय कर्ज मंजूर होणार नाही .
२ ) ५०००० रु. कर्जाची परतफेड हि २५ हप्त्याची राहील . हा नियम इथून
पुढे कर्ज उचलणाऱ्या सभासदासाठी राहील .
३ ) कर्ज बेबाक करताना ( जुने कर्ज भरून नवीन कर्ज उचलताना )
पगारीपासून १५ दिवस पर्यंत कोणतेही व्याज नाही परंतु १६ व्या दिवसापासून पुढे एक
महिन्याचे व्याज भरावे लागेल .
४ ) आजच्या बैठकीस गैरहजर सभासद श्री. लोंढे सर , श्री बळवन्ते सर ,
श्री. आमले सर , तांबोळी सर यांना दंडाची रक्कम 100 रु . प्रत्येकी द्यावी लागेल .
सर्व सन्माननीय सदस्य बैठकीस हजर राहिले व त्यांनी सुचवलेल्या कल्पना
बचत गटास मार्गदर्शक ठरतील .
धन्यवाद
बचतीची पद्धत
१ ) समुहातील सर्व सदस्यांनी समान रक्कम बचत करावी .
२ ) बचतीची रक्कम नियमित जमा करावी .
३ ) समुहातील सदस्यांनी आपल्या कौटुंबिक उत्पन्नातूनच बचत करावी .
४ ) समूहाच्या प्रत्येक सदस्याने दरमहा किमान 1100 रु इतकी रक्कम बचत
करणे आवश्यक आहे .
5 ) समुहातील सदस्याने वेळेवर बचत रक्कम जमा केली नाही तर त्यास प्रती
दिवस ५० रु या प्रमाणे दंड द्यावा लागेल .
६ ) दंडाची रक्कम समूहाच्या एकत्रित रक्कमेत जमा करण्यात येईल .
७ ) बचत करण्याची क्षमता जसजसी वाढत जाईल तसतशी बचतीचा हफ्ता
सर्वानुमते वाढविण्यात येईल .
८ ) समुहातील सर्व सदस्यांना दर महिन्याला बचतीच्या रक्कमेची माहिती बैठकी मध्ये देण्यात येईल .
९ ) बचतीची रक्कम बँकेत बचत खात्यात ठेवण्यात येईल .
नियमावली
१ ) वंदेमातरम् बचत गट हा महात्मा फुले विद्यालय परभणी येथील
कर्मचाऱ्यांचा आहे . त्यामुळे मासिक बचत हफ्ता जमा करण्याचा ठराविक तारीख नाही .
तर कर्मचार्यांची पगार झाल्यानंतर तीन दिवसापर्यंत जमा करावा .
तिसर्या दिवसानंतर दररोज ५० रु या प्रमाणे दंड आकारण्यात येईल .
२ ) दंडाची रक्कम समूहाच्या एकत्रित रक्कमेत जमा करण्यात येईल .
३ ) बचत करण्याची क्षमता जसजसी वाढत जाईल तसतसे बचतीचा हफ्ता सर्वानुमते
वाढवला जाईल .
४ ) समुहातील सर्व सदस्यांना दर महिन्याला बचतीच्या रक्कमेची माहिती
बैठकीमध्ये देण्यात येईल .
5 ) समुहातील श्री . चव्हाण प्रदीप माणिकराव यांना अध्यक्ष तर श्री .
क्षीरसागर अमोल महादेव यांना सचिव म्हणून निवडण्यात आले , तसेच
समुहाचे संयुक्त खाते समूहाच्या नावाने उघडण्याचे ठरवण्यात आले खात्यावरील देवान घेवाण
करण्याचे अधिकार अध्यक्ष व सचिव यांना राहतील असे ठरले .
६ ) समुहाचे खाते महाराष्ट्र ग्रामीण बँक परभणी या बँकेत उघडण्याचे ठरले
.
७ ) मासिक बैठकीस सर्व सभासद पूर्ण वेळ हजर राहतील परवानगी शिवाय गैरहजर
राहिल्यास ५० रु . दंड आकारण्याचे ठरले
८ ) एकंदरीत सदस्यांची बचत गटाच्या बैठकीच्या वेळी जमा करण्यात येईल व
कर्ज मंजुरी वसुली , सामाजिक व कुटुंब कल्याण कार्य कर्मांमध्ये खभाग व या बाबी
सम्बन्धित चर्चा व निर्णय गटाच्या बैठकीत घ्ण्यात येतील व गटाच्या बैठकीमध्ये
प्राधिकर प्राप्त झाल्या नंतरच रक्क काढण्यात येईल . गटाच्या बैठकीमध्ये घेण्यात
आलेले निर्णय सर्व सद्श्याना बंधनकारक राहतील आणि एकत्रितपणे सदस्यांच्या जीवन
मूल्यांमध्ये सुधारणा व विकास तसेच राहणीमान दर्जा उंचावणे यासाठी संघटीत रित्या
काम करणे आवश्यक आहे सर्व सभासदांना गटाच्या बैठकीस उपस्थित राहणे व नियमित बचत
करणे अनिवार्य आहे .
बुधवार, २२ एप्रिल, २०१५
सभासद
वंदेमातरम् बचत बचत गटाचे सभासद
१ ) चव्हाण पी एम ( अध्यक्ष )
१ ) चव्हाण पी एम ( अध्यक्ष )
२ ) क्षीरसागर ए एम ( सचिव )
|
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)


