१ ) वंदेमातरम् बचत गट हा महात्मा फुले विद्यालय परभणी येथील
कर्मचाऱ्यांचा आहे . त्यामुळे मासिक बचत हफ्ता जमा करण्याचा ठराविक तारीख नाही .
तर कर्मचार्यांची पगार झाल्यानंतर तीन दिवसापर्यंत जमा करावा .
तिसर्या दिवसानंतर दररोज ५० रु या प्रमाणे दंड आकारण्यात येईल .
२ ) दंडाची रक्कम समूहाच्या एकत्रित रक्कमेत जमा करण्यात येईल .
३ ) बचत करण्याची क्षमता जसजसी वाढत जाईल तसतसे बचतीचा हफ्ता सर्वानुमते
वाढवला जाईल .
४ ) समुहातील सर्व सदस्यांना दर महिन्याला बचतीच्या रक्कमेची माहिती
बैठकीमध्ये देण्यात येईल .
5 ) समुहातील श्री . चव्हाण प्रदीप माणिकराव यांना अध्यक्ष तर श्री .
क्षीरसागर अमोल महादेव यांना सचिव म्हणून निवडण्यात आले , तसेच
समुहाचे संयुक्त खाते समूहाच्या नावाने उघडण्याचे ठरवण्यात आले खात्यावरील देवान घेवाण
करण्याचे अधिकार अध्यक्ष व सचिव यांना राहतील असे ठरले .
६ ) समुहाचे खाते महाराष्ट्र ग्रामीण बँक परभणी या बँकेत उघडण्याचे ठरले
.
७ ) मासिक बैठकीस सर्व सभासद पूर्ण वेळ हजर राहतील परवानगी शिवाय गैरहजर
राहिल्यास ५० रु . दंड आकारण्याचे ठरले
८ ) एकंदरीत सदस्यांची बचत गटाच्या बैठकीच्या वेळी जमा करण्यात येईल व
कर्ज मंजुरी वसुली , सामाजिक व कुटुंब कल्याण कार्य कर्मांमध्ये खभाग व या बाबी
सम्बन्धित चर्चा व निर्णय गटाच्या बैठकीत घ्ण्यात येतील व गटाच्या बैठकीमध्ये
प्राधिकर प्राप्त झाल्या नंतरच रक्क काढण्यात येईल . गटाच्या बैठकीमध्ये घेण्यात
आलेले निर्णय सर्व सद्श्याना बंधनकारक राहतील आणि एकत्रितपणे सदस्यांच्या जीवन
मूल्यांमध्ये सुधारणा व विकास तसेच राहणीमान दर्जा उंचावणे यासाठी संघटीत रित्या
काम करणे आवश्यक आहे सर्व सभासदांना गटाच्या बैठकीस उपस्थित राहणे व नियमित बचत
करणे अनिवार्य आहे .
वरील ठराव खालील समूहांच्या
सदस्यान बंधनकारक राहील